भेट तुला या शुभ दिवसाची

निल गगनाची साथ तुलासाद तुला त्या इंद्रधनुची..
निल गगनाची साथ तुला,  साद तुला त्या इंद्रधनुची..


निल गगनाची साथ तुला,
साद तुला त्या इंद्रधनुची..
निसर्गाची हि बदलती चक्रे ,
भेट तुला या शुभ दिवसाची ||||

 
झुळ-झुळणार पाणी हि गात,
गीत तुझ्या त्या मधु-वाणीची..
निसर्गाची हि बदलती चक्रे ,
भेट तुला या शुभ दिवसाची ||||


निशीगंधेचा  सुवास वाहतो,
पाहतो चाफा हि घेऊन रुची..
निसर्गाची हि बदलती चक्रे ,
भेट तुला या शुभ दिवसाची ||||


आयुष्याचा प्रवास चालतो,
घेऊन साथ हि तुझ मैत्रीची..
निसर्गाची हि बदलती चक्रे ,
भेट तुला या शुभ दिवसाची ||||



आनंदाचे क्षण लाभावे,
देऊन साथ तुला ह्या जन्माची..
निसर्गाची हि बदलती चक्रे ,
भेट तुला या शुभ दिवसाची ||5||



कुंपने सगळी तोडावी काळाची,
राग-रुसवे सहज विसरावी..
क्षमा असावी उशीरा केल्याची,
तुम्ही आहातच खास, भेट आम्हाला आयुष्याची..||6||

No comments

Powered by Blogger.