शब्द तुझ्या मागणीचा !!
शब्द तुझ्या मागणीचा
!!
तुटलेल्या ह्रुदयाचा
सुर्य आज पुन्हा मावळला ,
तुला काही न सांगता
शब्द तुझ्या मागणीचा पुन्हा मागे सरला !!१!!
का होते माझ्या
सोबतच असे ?
प्रश्न आज पुन्हा
मनात दाटला ...
कधीचा थांबलेला
अश्रु हि आज पुन्हा ढासाळला ,
सोबतच ,
तुला काही न सांगता
शब्द तुझ्या मागणीचा पुन्हा मागे सरला !!१!!
फक्त तुला पाहणच
आज पर्यन्त जमलं ,
आता देव ही रुसलाय
कि काय आज पुन्हा समजल !!
गाठावे कधी तुला
नि सांगावे कधी ...ह्याच विचाराने दिवस हि सरला ,
चांदण्याहि आज च्ंद्र
नाही आकाशात म्हणुन एकट्याच रडल्या,
मन मोकले केल्या
विना रहावेही कसे ?
का ? तु समजत नाही
माझ्या अबोलाची भाषा ,
दाटलेल्या भावनेलाही
आहे तुझ्या परतीची अभिलाषा !!
उगाच का असेच तुझ्या
विरहतुन दिवसही सरतात ,
फुललेली फुलेही
पुन्हा कोमेजुन बागेतच पडतात !!
तुटलेल्या ह्रुदयाचा
सुर्य आज पुन्हा मावळला ,
तुला काही न सांगता
शब्द तुझ्या मागणीचा पुन्हा मागे सरला !!१!!
मyur
valavi
No comments